गरिबांना आर्थिक मदत द्या: प्रितीताई दिडमुठे सरपंच साठगांव ग्रामपंचायत.
गरिबांना आर्थिक मदत द्या: प्रितीताई दिडमुठे सरपंच साठगांव ग्रामपंचायत.

गरिबांना आर्थिक मदत द्या: प्रितीताई दिडमुठे सरपंच साठगांव ग्रामपंचायत.

साठगांव ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी गोरगरीब जनतेला आर्थिक मदत मिळविण्यासाठी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आर्थिक मदत मागणी निवेदन

गरिबांना आर्थिक मदत द्या: प्रितीताई दिडमुठे सरपंच साठगांव ग्रामपंचायत.
गरिबांना आर्थिक मदत द्या: प्रितीताई दिडमुठे सरपंच साठगांव ग्रामपंचायत.

मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे की राज्यामध्ये मागील मार्च महिन्यापासून कोरोना १९ चा प्रसार झपाट्याने होत असून गेल्या काही दिवसात कोरोना संपूर्ण महाराष्ट्राला विड्ख्यात घेण्याची शक्यता निर्माण होत असतांनाच महाराष्ट्र शासन या विडखात्यातून महाराष्ट्राला सोडविण्याचे हेतूने संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे. आणि ते अनिवार्य आहे त्यांचे आम्ही स्वागत व पूर्णपणे समर्थन करीत आहोत.

येथे लॉकडाऊनचे समर्थन करीत असतांना काही महत्वाच्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. मागील २०२० मध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील कामगार, हातगाड्यावरील व्यावसायीक, परिवहन कामगार, शेतकरी, शेतमजूर,पानटपरीचालक, चायविक्रेते, छोटे हॉटेल धारक विटाभट्टी कामगार न्हावी कामगार, गावठी कामगार व इतर कष्टकरी जनतेचे आर्थिक कंबरडे मोडल्या गेले आहे. आर्थिक संकटातून सावरण्याआधी दुसरे लॉकडाऊन डोळ्यासमोर ऊभे आहे.यामुळे जनता पूर्णपणे धास्तावून गेली आहे आणि म्हणून जनतेला लॉकडाऊन मध्ये झोकत असताना त्यांना एक दिलासा म्हणून अन्यधान्यच्या स्वरुपात व किमान १५ ते २० दिवसाचे कुटुंबांपुरते रेशन व त्यासोबत पर व्यक्ती आर्थिक स्वरुपाची २०००/- ते ३०००/- रुपया पर्यंतची मदत करण्याची आम्ही मागणी करीत आहोत.

असे झाले तरच हे लॉकडाऊन यशस्वी व परिणामकारक ठरेल व जनतेला सांभाळून पुढे नेण्यासाठी याची आठवण देण्यासाठी हे निवेदन देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here