भिसी वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागेत अवैध उत्खनन; वन अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी.
भिसी वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागेत अवैध उत्खनन; वन अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी.

भिसी वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागेत अवैध उत्खनन; वन अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी.

भिसी वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागेत अवैध उत्खनन; वन अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी.
भिसी वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या जागेत अवैध उत्खनन; वन अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, भिसी वनपरीमंडळ अतर्गत मौजा कन्हाळगाव कु. येथे सरकार वन म्हणून राखीव क्षेत्रामधील मधील सर्वे न. १७५ मधे शंकरपूर -चिमूर हायवे प्रा.लि. ने खाजगी परवानाचा सर्वे न. १४७ चा आधार घेत अवैध्य उत्खनन करित सरकारची दिशाभुल करुण वन मालमत्तेची खुलेआम चोरी केली आहे.

मागील काही वर्षापासून शंकरपूर -चिमूर हायवे प्रा.लि. चे काम प्रगती पथावर आहे . यासाठी लागणारा मुरूम साठा संबधीत ठेकेदारानी (कोठारी )या भागातून खाजगी परवाना काढून वापरला . त्यात ही त्यांनी खुपवेळा शेतकर्यांची अशाप्रकारे फसवणूक केली. २०० ब्रासची परवानगी काढून ५०० ब्रासचे उत्खनन केले आहे.

ही बाब खाजगी परवान्या चीअसल्यामुळे वनविभाग किंवा महसूल विभाग यांनी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही .परंतू या वेळेस ठेकेदाराने मोजा कन्हाळगाव कु . येथील श्री अकुश आडे व इतर ४ भाऊ यांच्या नावे असलेले गट क्र. १४७ मधील ०.७६ आर पैकी o.४० आर ही जागा ५०० ब्रास मुरूम उत्खननासाठी तहसिलदार चिमूर यांचे आदेशान्वये ८-४ – २०२१ पासून १४-४ -२० २१ पर्यत याच्या परवाना काढला होता. परंतू यामध्ये संबधीत ठेकेदाराने कास्तकाराच्या संगणमताने आपल्या गट क्र.१४७ मधे खोदकाम न करता सरकार वन म्हणून (चराई ‘जळावू वन, झुडपी जंगल व कास्तकारी या कामासाठी सरक्षीत असलेली ३०.८ हेक्टर मधील गट क्र.१७५ मधे अवैध्य खोदकाम केले.

ही बाब वनकर्मचारी यांना गस्तीवर असताना लक्षात आली. त्यामुळे दुसरया दिवशी काम चालू असलेल्या ठिकाणावर जावून वन कर्मचारी, वनरक्षक अमोल झलके व त्यांचे सहकारी यांनी संबधीत ठेकेदाराचे सुपर वायझर विनायक कावरे व शेतकरी अंकूश आडे यांना समजावून सांगूण काम बद करण्यास सांगितले परंतू कावरे यांनी तुम्ही तुमचे काम करा मी माझे काम करतो असे बोलत वन कर्मचार्या सोबत हज्जत बाजी केली .शेतकरी सुद्धा ही पुर्ण जागा माझीच आहे असे म्हणत काम बंद होणार नाही मी माझ्याच जागेत खोदकाम करीत आहे. असी अरेरावी वन कर्मचर्या सोबत केली परंतू काम थांबविले नाही.

या संदर्भत गडपिपरी सा.क्र २१ चा कार्यभार असलेले पटवारी वाघमोडे यांना भ्रमणध्वनी वरुण माहीती दिली असता त्यांनी सुद्धा जागेची चौकशी न करता ठेकेदाराने परवानगी काढूनच कास्तकाराच्या मालकी जागेवरच खोदकाम केले आहे असे म्हणत आपली जबाबदारी झटकली . परंतू संबधित वन कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वरुण मिळालेल्या माहीचीचा पाठपुरावा केला नाही. अशा प्रकरे ठेकेदार व कास्तकार मजेत असून महसुल विभाग गाठ झोपेत आहे असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here