नाचणगावात सापडले 428 ग्रॅम मोगलकालीन सोने

61

नाचणगावात शेतात मजुरांना सापडले 428 ग्रॅम मोगलकालीन सोने.

नाचणगावात शेतात मजुरांना सापडले 428 ग्रॅम मोगलकालीन सोने.
नाचणगावात शेतात मजुरांना सापडले 428 ग्रॅम मोगलकालीन सोने.

 आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
पुलगाव दि
11:-
नाचणगाव शिवारात शेतात मजुरांना लोखंडी पेटीत मोगलकालीन शिक्यांसह 428 ग्रॅम सोने सापडले. ही घटना आज 11 रोजी नजीकच्या नाचणगावात उघडकीस आली.
शेतकरी सतिश चांदोरे यांनी काही घराची माती शेतात टाकली. ही माती बारीक करून पसरवून टाकण्यासाठी मजूर शेतात काम करीत होत्या. त्यांना हे काम करीत असताना एक कापडात गुंढाळलेली पेटी सापडली. पेटीत काय आहे याची महिला चाचपणी करत असताना शेतमालक तेथे पोहोचला. महिला एकत्र येऊन काय करीत आहे हे पाहत असताना पेटीत सोने दिसले. तो ती घरी घेऊन गेला. नंतर मजूर त्याच्या घरी पोहोचून पेटी व सोन्याबद्दल विचारू लागले तेव्हा त्याने त्यांना हुसकावून लावले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांना माहिती मिळताच पुलगाव पोलिस शहानीशा करण्यासाठी सतिश उल्हास चांदोरे रा. नाचनगाव याच्या घरी पोहोचले.

घराची माती ही शेतात काडीकचरा वेचताना मजूर प्रिया अनिल टेभुर्णे रा. नाचनगाव व तिच्या सोबत काम करणार्‍या इतर चार महिलांना लोखंडी डब्बी मिळाली. त्यात बघितले असता त्यामध्ये सोने मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोखंडाची डब्बी सतिश चांदोरे यांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आली. त्यात नॅशनल बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले सोन्याचे एक बिस्कीट, मोगल कालीन सोन्याचा शिक्का, सोन्याचा चौकोणी तुकडा, गोल सोन्याचे वेळे, कानातील सोनाचे रिंग असे 428 ग्रॅम सोने मिळून आले. त्याची आज बाजारातील किंमत 20 लाख 54 हजार 400 रुपये आहे. हा मुद्देमाल जप्त करून पुरातत्त्व विभागाकडे हस्तातरीत करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलिस स्टेशनेचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्या निर्देशाने दहिलेकर, खुशाल राठोड, बाबुलाल पंधरे, महादेव सानप, जयदीप जाधव, मुकेश वादीले, सचिन बागडी यांनी केली आहे.