कामठीला अवैद्य रेती चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; कन्हान पोलीसाची कारवाई ६ लाख ४ हजारचा मुद्देमाल जप्त.

58

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
कन्हान :- नदी घाटरोहणा घाटातुन अवैद्यरित्या रेती चोरून आणताना ट्रॅक्टर ट्रॉली सह आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडुन १ ब्रॉश रेती, ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

मंगळवार (दि.११) ला सकाळी ६. ४५ वाजता परी. पो. उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की कन्हान नदीच्या घाटरोहणा घाटातुन लाल रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉली रेती चोरून जुनिकामठी रस्त्याने कन्हान कडे आणत आहे. यावरून कन्हान पोलीसानी जुनीकामठी शिवारात नाकाबंदी करित आरोपी राजेश नवरंग सिंग वय ३४ वर्ष रा मडीबाबा खदान नं ३ हा स्वराज कंपनी चा लाल रंगाच्या ट्रॅक्टर क्र एम एच ३१ ए जी ६१८९ व ट्रॉली क्र एम एच ३१ झेड ३९५६ मध्ये विना रॉयटी कन्हान नदी घाटरोहणा घाटातुन १ ब्रॉश रेती चोरून आणताना मिळुन आल्याने त्यास विचारपुस केली असता बबलु यादव कन्हान यांचे सांगण्यावरून ही रेती चोरून आणत असल्याचे सांगितल्याने आरोपीस कन्हान पोस्टे ला आणुन सरकारी फिर्यादी वरून अप क्र १३४/२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी राजेश नवरंग सिंग यास अटक करून २) बबलू यादव कन्हान यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली किमंत ६ लाख रू. चोरीची रेती १ ब्रॉश किंमत ४ हजार रू असा एकुण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तपासात घेतला. ही कारवाई परी.पो.उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम, पीएसआय जावेद शेख, एएस आय येशु जोसेफ, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, चालक नापोशि संदीप गेडाम आदीने शिताफितीने करून आरोपीस रंगेहाथ पकडुन कारवाई केली.