वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस निसर्गाने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास.

56

वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस निसर्गाने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास.

तालुक्यात झालं धान पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांचे सरकार कडे नुकसान भरपाई साठी साखळे.

वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस निसर्गाने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास
वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस निसर्गाने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
लाखनी:- तालुक्यात सोमवार दिनांक 10 मे 2021 रोजी अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला आहे .शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कोण शेतकऱ्यांसमोर मोठा सवाल .

सोमवार दिनांक 10 मे 2021 सायंकाळी 7:45 मिनिटांनी वादळी वाऱ्यासह पाऊस ,गारपीट मोठ्या प्रमाणात पडली .यामुळे उन्हाळी धान, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गावातील टीनाचे पत्रे,घरावरील कवेली व झाडे मुळासकट गळून पडले आहे. मोठ्या परिश्रमाने रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यात कोणत्याच प्रकारचे सिंचनाची सोय नाही .अहोरात्र डोळ्यात तेल घालून इलेक्ट्रिक पंपाच्या साह्याने धान पीक व भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. तळहाताच्या फोडा प्रमाणे शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेतो.मात्र निसर्गासमोर कोणाचे काहीच चालू शकत नाहीत. आधीच जनता कोरोना संसर्गजन्य रोगाच्या महामारी चा संकटात आहे.त्यात निसर्गाचा महाप्रकोप या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावं कसं असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा होत आहे. आता शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईसाठी साकडे घातले आहे .

महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी साहेबांनी व लोकप्रतिनिधींनी सोमवार दिनांक 10 मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची दखल घेत. महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या कर्मचाऱ्यां मार्फत नुकसान भरपाईच्या करिता पंचनामे करावे. महाराष्ट्र शासनाने नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.