कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक खार पोलिसांची धडक कारवाई.

50

कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक खार पोलिसांची धडक कारवाई.

कोरोना आजाराने पिडीत रुग्णांच्या गरजू नातेवाइकांची फसवणूक करु पाहणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या वृत्तीस आळा घालण्याचे कौशल्यपूर्ण कामगीरी खार पोलीस स्टेशन.

कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक खार पोलिसांची धडक कारवाई.
कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक खार पोलिसांची धडक कारवाई.

✒मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि. 12.मे:-
 सध्या कोरोना या महामारीचा आजार बळावत असून त्यावरील उपचाराकरिता रेमडिसीव्हर या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याची ब्लॅक मार्केटिंग देखील होत आहे. याच गोष्टीचा फायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत असून त्या माध्यमाद्वारे लोकांची फसवणूक होत आहे.

याच बाबत दिनांक २७/०४/२०२१ रोजी फिर्यादी कुणाल गोविंद कटारिया यांनी खार पोलीस ठाण्यात समक्ष येऊन तक्रार दिली कि, त्यांना रेमडिसीव्हर इंजेक्शन आवश्यक असल्याने त्यांनी दि.२७/०४/२०२१ रोजी त्याबाबत गुगल द्वारे सर्च केला असता त्यांना सिपला फाऊंडेशन नावाने मोबाईल क्रमांक ९६०९९७१२४३ हा प्राप्त झाला. सदर मोबाईल वरती संपर्क करून इंजेक्शनची मागणी केली असता त्या अनोळखी इसमाने त्यांना ६ इंजेक्शनचे २०,४००/- रुपये ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यास सांगून सदरचे ट्रांजेक्शन एक वेळेस फेल दाखवून दोन वेळा ट्रांसॅक्शन करून घेऊन तक्रारदाराची ४०,८००/- रुपयाला फसवणूक झाल्याची तक्रार खार पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो.उ.नि नेत्रा मुळे यांच्याकडे केली.

ठाणे अंमलदार नेत्रा मुळे यांनी जराही वेळ न घालवता ट्रांजेक्शन झालेल्या अकाऊंटची माहिती मिळवून सदर बँक अकाऊंट च्या नोडल ऑफिसर शी संपर्क साधून सदरचे अकाउंट फ्रिज केले .
सदर A/C ४४६८१०११००१२४९५ बँक ऑफ इंडिया शाखा पटना असे असून त्या अकाउंट मध्ये एकूण १३,३७,३०५/- रुपये ट्रांजेक्शन होवून शिल्लक बाकी ३,८०,१३८/- रुपये (freez amount) एवढी असल्याचे दिसून आले आहे. आणि त्यात फिर्यादी ने ट्रान्सफर केलेली रक्कम 40,800/- देखील दिसून येत असून अन्य बर्याच गरजू व्यक्तींची फसवणूक झाली असल्याचे दिसून येते आहे.
सदर फ्रॉड अकाऊंटची अधिक माहिती मिळवण्यात येत असून गु.र.क्र. ३९७/२१ कलम ४२० भादंवि सह ६६ (क) (ड) आयटी ऍक्ट अन्वये तपास सुरू आहे.

खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले व पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदीप एडे-पाटील यांचे मार्गदर्शनाने यातील फिर्यादी यांचे फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यास यशस्वी झाले बद्दल व त्यांच्या या चांगल्या कामगीरी बद्दल म.पो.उ.नि. नेत्रा मुळे व पो.उ.नि. दिपक खराडे यांचे खार पोलीस ठाणेचे वतीने अभिनंदन होत आहे.