धारावीतील वैक्सिन सेंटर वर स्थानिक लाभार्थी ऐवजी बाहेरचे लाभार्थ्यांचे प्रमाण जास्त

51

*धारावीतील वैक्सिन सेंटर वर स्थानिक लाभार्थी ऐवजी बाहेरचे लाभार्थ्यांचे प्रमाण जास्त*

धारावी – धारावीची लोकसंख्या पाहता याठिकाणी किमान चार वैक्सिन सेंटर ची गरज असताना सुरुवातीला फक्त एकच सेंटर छोटा सायन येथे सुरू केले.त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर दुसरे वैक्सिन सेंटर अलीकडेच ट्रँझिस्ट कॅम्प,एम,जी,रोड,येथे सुरू केले आहे.
याठिकाणी धारावीतील लाभार्थीना लसीकरण मिळत नाही.मात्र धारावी बाहेरून आलेले (उदा: बांद्रा, चेंबूर,कुर्ला,आदी) भागातील लाभार्थी मोठ्या प्रमाणात येत असून स्थानिकांचा विचा करून सुरू केलेल्या सेंटर वर बाहेरचे लाभार्थी कसे ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
तसेच या सेंटर वर मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरू असल्याचे अनेक तक्रारी आल्या आहेत. धारावीतील लोकांना प्रवेश दिला जात नाही.मात्र बाहेरून येणारे लोकांना आत सोडले जात असल्याने देखील नागरिक संतापले आहेत.
प्रशासन महानगरपालिका वैधकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त याकडे लक्ष देतील का ? असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.