प्रशासनाने घेतली दखल, धान पिकांचे पंचनामे सुरु महसुल विभाग, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या शेतात.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
लाखनी:- तालुक्यात सोमवार दिनांक १० मे रोजी अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडातुन घास हिसकावला या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत महसूल विभाग,कृषी विभाग शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले.
लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तुप, भुंगाव परिसरात महसूल विभागाचे तलाठी कृषी विभागाचे कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक यांनी सोमवार दिनांक १०मे रोजी झालेल्या .वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला .उन्हाळी धान पिक व भाजीपाला पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी सरकार कडे साकडे घातले. झालेल्या धान पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता मुरमाडी/तुप आणि भुंगाव येथील तलाठी संजय मेश्राम ,मोरेश्वर मरस्कोल्हे आणि कृषी सहायक विद्या गिरेपुंजे कृषी सेवक योगेश गजभिये यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले.
महाराष्ट्र शासनाने १० मे रोजी झालेल्या.या पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. या नुकसान ग्रस्त धान पिकाचे पंचनामे देखील झाले.आता महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई केव्हा मिळेल असा प्रश्न शेतकऱ्याना पडत आहे.
योगेश गजभिये कृषी सेवक मुरमाडी /तुप
आम्ही आपल्या सहकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी केली. त्यांचे पंचनामे केले. १०मे रोजी वादळी वाऱ्या सोबत गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कडप्पा पावसामध्ये सापडल्या .पाऊसा मुळे धान खाली पडल्या. पावसामुळे धानाचे लोबखाली पडून गेलेल्या सर्व गोष्टींची पाहणी करून पंचनामे केले.