हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास प्रहार पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा रुग्णमित्र गजू कुबडे यांचा इशारा

हिंगणघाट
. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था वाढत्या कोविड रुग्ण संख्येमुळे करण्यात यावी जर या भागातील जनतेची ही न्यायोचित मागणी मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही क्षणी उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल असा खणखणीत इशारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दि 12 मेला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.सदर निवेदन आज दि १२ मे ला उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभान खंडाईत यांच्या मार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात आले.
या बाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दि.19 एप्रिल व 22 एप्रिलला २०० बेड्सच्या निर्मितीसाठी निवेदन सादर केले होते.निवेदनातून दिलेल्या इशाऱ्यानुसार श्री कुबडे यांनी दि 26 एप्रिलला कोविड संदर्भातील शासकीय नियमांचे पूर्ण पालन करून स्वतःच्या घराच्या छतावर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता करण्या पूर्वी सायंकाळी 6 वाजता येथील उपविभागीय अधिकारी श्री खंडाईत यांनी व्हिडीओ कॉल करून श्री कुबडे यांच्याशी चर्चा केली व या मागणी साठी थोडा अवधी देण्याची विनंती केली होती.त्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून येथील ठाणेदार श्री संपतजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष गजू कुबडे यांचे घरी येऊन उपोषण सोडविले होते.
वरिष्ठ अधिकारी यांच्या विनंतीनुसार त्यावेळी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.परंतु सदरची मागणी ही येथील सर्वहारा,गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे त्यांनी सातत्याने 200 बेड्सची मागणी लावून धरलेली आहे. याबाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन ही मागणी मंजूर करावी अशी श्री कुबडे यांनी कळकळीची विनंती आहे.
जर ही न्यायोचित मागणी येत्या आठ दिवसात मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला जिल्ह्यातील /तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या घरा समोर तीव्र आंदोलन छेडील व त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here