राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय

46

राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
नागपूर : 12/05/2021 नागपुरात दोन गडकरी एकत्रित आले आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट सारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयाला मोलाची मदत तातडीने उपलब्ध झाली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये डॉ. राहुल मरोठी यांचे रुग्णालय असून त्यात कोरोना बाधितांसाठी 25 बेड्सची व्यवस्था गेले अनेक दिवसांपासून तयार होती. मात्र, प्रशासन डॉ. मरोठी यांच्या रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी 25 बेड्सची परवानगी देत नव्हते. अनेक वेळा प्रयत्न करूनही जिल्हा प्रशासन परवानगी देत नाही म्हणून डॉ. मरोठी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांना संपर्क साधले.
कार्यकर्त्यांनी ही बाब मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांना सांगितली. हेमंत गडकरी यांनी हिंगणघाटसारख्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांना तातडीने मदत मिळावी यासाठी पक्षीय भेद सोडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धावले. नितीन गडकरी यांनी त्यांच्या स्वभावानुसार तातडीने मनसे नेते हेमंत गडकरी आणि हिंगणघाटमधील डॉ. राहुल मरोठी यांना बोलावून घेतले.
नितीन गडकरी यांनी त्वरित वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून रुग्णालय कोरोना जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची सोय झाल्यास त्वरित परवानगी देण्याची तयारी दाखविली. नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील बुटीबोरी मधून ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करून दिली.
नागपुरात मात्र पक्षीय भेद बाजूला ठेऊन एकेमकांना मदत करण्याचा नवा आदर्श पाहायला मिळाला आहे आणि गडकरी यांनी कोरोना काळात राजकारण नको त्यांचे हे वक्तव्य फक्त भाषणापुरतं मर्यादित नसून कृतीत आणून दाखविले आहे