आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग.
आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग.

आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग;रेकॉर्ड रूम जळून खाक.

आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग.
आर्वी तहसील कार्यालय परिसरात भीषण आग.

✒आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा:- वर्धा जिल्हातील आर्वी येथील तहसील कार्यालय परिसरात पहाटे 2 ते 3  वाजता अचानक लागलेल्या आगीने ट्रेझरी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नायब तहसीलदार कार्यालय आणि रेकॉर्ड रूम जळून खाक झाली. संजय गांधी निराधार योजनेतील काही रेकॉर्ड वाचविण्यात यश आले. रात्री 2 ते 3 सुमारास ही आग लागली. 3.30 वाजता पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले राहुल देशमुख यांना कार्यालयातून धुळीचे लोट दिसले असता त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तेथे पोलीस ड्युटीवर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केले घटनास्थळी नगरपालिका अग्नीशमन गाडी ने आग विझविण्याचा  प्रयत्न केला.  परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आष्टी आणि पुलगाव येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागले. सतत दोन ते अडीच  तास  आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके तहसीलदार विद्यासागर चव्हाण ठाणेदार संजय गायकवाड नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे उपमुख्य अधिकारी रणजित पवार साकेत राऊत पोहोचले. पोलीस स्टेशन कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here