राज्यातून मुंबईला येणाऱ्या महिलांसाठी निवासाची व्यवस्था करून द्या.

54

राज्यातून मुंबईला येणाऱ्या महिलांसाठी निवासाची व्यवस्था करून द्या.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे मागणी.

राज्यातून मुंबईला येणाऱ्या महिलांसाठी निवासाची व्यवस्था करून द्या.
राज्यातून मुंबईला येणाऱ्या महिलांसाठी निवासाची व्यवस्था करून द्या.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- राज्यातून कामानिमित्य मुंबईत मोठ्या संख्येत महिला येतात. निवासाची व्यवस्था नसल्यामुळे महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अनेकदा महिलांवर मुबई येथे वाईट प्रसंग आल्याचेही दिसून येते. त्यामुळे सोयीकरिता व सुरक्षेकरिता महिलांना स्वतंत्र मुंबईत निवासाची व्यवस्था करून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे भेटून त्यांना निवेदन देखील देण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यावेळी उपस्थित होते.

आज राजकारणात तसेच प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात महिला सक्रिय आहेत. त्या पुरुषा पेक्षा कुठेही मागे नाहीत. मुंबई येथे मंत्रालय व अन्य कामाकरिता महिलांना जावे लागते. तेव्हा त्यांच्या निवासाच्या प्रश्न नेहमी उद्भवत असतो. त्या निवासाची सोया उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या देखील प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न निकाली काढावा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी महिलांच्या प्रशांवर आवाज उठवीत असतात. मोठ्या प्रमाणात त्यांनी महिलाना न्याय मिळण्याकरिता नेहमी ते आग्रही असल्याचे दिसून येते. जमिनीवर राहून काम करणारी महिला आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्या मुळे हा देखील महिलांची मोठी समस्या दूर करण्याकरिता त्यांनी हि मागणी केली आहे. लवकरच या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी दिले.