लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप, मुलगी राहली गरोदर.

55

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप, मुलगी राहली गरोदर.

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप, मुलगी राहली गरोदर.
लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप, मुलगी राहली गरोदर.

✒️अभिजीत सकपाळ प्रतिनिधी✒️
ठाणे,दि.13मे:- मुंबईच्या उपनगरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे महिला अत्याचाराने पुन्हा एकदा ठाणे हादरले. ठाण्यातील एका 16 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश कदम वय 21 वर्ष याच्यासह तिघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. या तिघांनाही 19 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पिडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

धर्मवीर नगरमध्ये राहणारा आरोपी आकाश कदम यांची आणि पिडित तरुणीची एक वर्षा अगोदर ओळख झाली. या ओळखीतून या दोघात प्रेमाचे अंकुर फुलले. तील आरोपी आकाश ने वेगवेगळी आमिष दिली. त्याने तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. व 12 ते 13 नोव्हेंबर 2020 ला तील स्वताःच्या घरी बोलावुन त्या तरुणीवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या घरात हा प्रकार कोणाला समजू नये, यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आकाशचा मित्र विकी उर्फ विकास करोतिया वय 21 वर्ष तसेच विकीचा मित्र सागर करोतिया वय 26 वर्ष यांनीही आकाशच्या घराजवळील परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातूनच ती चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. त्यावेळी तिने आईला ही आपबिती सांगितली. कुटूंबीय रागावतील या भीतीने आपण हा प्रकार सांगितला नसल्याचेही तिने सांगितले.

मुलीच्या आईने तातडीने याप्रकरणी 12 मे 2021 रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चव्हाण यांच्या पथकाने आकाश याच्यासह तिघांनाही अटक केली.