वरुर (रोड) येथे विस खाटांचे कोरोना विलगीकरन कक्षाचे उद्घाटन.
तलाठी विनोदजी गेडाम यांनी गावकरी च्या मदतीने २० खांटाचे विलगीकरन कक्ष अखेर केले तयार

तिरूपति नल्ला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- वरुर रोड येथे कोरोनाचे वाढते पेशंट बघता 20 खाटांच्या विलगीकरन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. वरुर रोड येथे कोरोना रुग्णाची संख्या दिवसे न दिवस वाढतच होती, याची माहिती तेथील साजाचे पटवारी विनोदजी गेडाम यांना माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाच्या लक्षात ती बाब आणून दिली,परंतु प्रशासना कडून ग्रामपंचायतला कसलीही निधी उपलब्ध न झाल्याने विनोद गेडाम तलाठी वरूर रोड यांनी कोरोना दक्षता समितीची सभा घेऊन आपणच गावकर्यांच्या मदतीने विलगिकरन कक्ष तयार करण्याचा निर्णय घेऊन गावकरी याच्या सहभागातून संपूर्ण विलगिकरन कक्ष ची निर्मिती करून गावामध्ये रुग्ण तपासणीचा कॅम्प लावून कोविड तपासणी करण्यात आली त्यात 14 व्यक्ती कोरोना बाधित निघाले असून त्यांना या कक्षात ठेवण्यात आले असून याना दोन वेळचे जेवण नास्ता, चहा, अंडे ,फळे हे लोकसहभागातून याची व्यवस्था करण्यात आली असून प्राथमिक उप आरोग्य केंद्र वरूर रोडच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात येत असून ग्रामपंचायत वरूर रोड चे ग्रामसेवक श्री मरापे साहेब व इतर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व पंचायत समिती सदस्य श्री पुसाम जी याच्या मार्फत व्यवस्था करण्याचे काम चालू आहे.
20 खांटाचे कोविड विलगीकरन कक्ष स्थापन करुन आज उपविभागीय अधिकारी संपत कराटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी, तलाठी विनोदजि गेडाम, ग्रामसेवक मरापे, प.स.स.रामदास पुसाम, संरपच संगीता कोडापे, ऊपसंरपच रमेश काळे, पोलिस पाटील बंडुजि भोगंळे, आरोग्य सेविका गेडाम मॅडम, मरापे मॅडम, ठाकूर मॅडम, आशा वर्कर रंजना नगराळे, सोलार कंपनीचे मॅनेजर वसंतराव वरारकर, ग्रा. पं. सदस्य आबाजी धोनोरकर, प्रतिष्ठित नागरिक राजु धानोरकर हे उपस्थित होते.