जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नामुळे सातगाव डोंगरी मध्ये कोविड लसीकरणाचे उद्घाटन.

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
पाचोरा:- तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे जळगाव जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नामुळे 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना व भगिनींना कोविड लस देण्याचा सुभारंभ करण्यात आला आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे व सरपंच भरत राठोड, उपसरपंच रज्जाक रमजान तडवी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, सतीश पाटील, आकाश डाबरे, सागर चौधरी, सुनील मराठे, मुख्याध्यापक वाघ सर, पोलीस पाटील, ग्रामसेवक के. डी. पवार तसेच आरोग्य अधिकारी डॉ चंद्रशेखर पाटील, आरोग्य सेवक डॉ गोकुळ शिरसाट,नरसा मॅडम, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील 45 वर्षा पुढील 50 व्यक्तींना कोविडशिलड ही लस देण्यात आली या पुढे लस उपलब्ध होईल तशी देण्यात येणार आहे तर गावातील 45 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्तींना कोविडशिलड लसीकरण येत्या काही दिवसांत केले जाईल असे यावेळी जळगाव जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी बोलताना सांगितले.