ठाण्यात लेटर बॉक्समध्ये आढळला मृतदेह; दुर्गंधीनंतर उघडकीस आली बाब.

✒️अभिजीत सकपाळ भिवंडी प्रतिनिधी✒️
मुंबई/ ठाणे,दि.14 मे:- मुंबईच्या उपनगर ठाणे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे लोकांना एकच धक्का बसला आहे. पोस्ट ऑफ़िसचा एका लाल रंगाच्या लेटर बॉक्स मध्ये मृतदेह आढळून आला. त्यामुळे या परिसरात चांगलेच चर्चेला उधान आले. सात वाजण्याच्या सुमारास दिवा-शिळफाटा मार्गावरील खर्डी गावात ही पोस्ट ऑफ़िसची लेटर बॉक्सची लाल रंगाची लोखंडी पेटी आढळून आली.
पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार गुरूवारी 13 मे ला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दिवा-शिळफाटा मार्गावरील खर्डी गावात ही लाल रंगाची लोखंडी पेटी आढळून आली. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांची स्थानिकांनी अग्नीशमन दलाला संबंधित घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी पेटी उघडली असताना स्थानिकांसहीत जवानांनाही मोठा धक्का बसला. कारण, त्या पेटीत एका पुरूषाता मृतदेह आढळून आला. साधारण, या मृत व्यक्तीचे वय 35 वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. ही मृतदेह असलेली पेटी या परिसरात कशी आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. हा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठविलेला आहे.