हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ता आणि कॉंग्रेस नेत्या मंगला ठक कोरोना बाधित.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.15मे:- हिंगणघाट मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंगणघाट येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता, अपंग, अनाथ, निराधार लोकांना मदतीचा हाथ देऊन, त्यांच्या समस्या सातत्याने शासन दरबारी मांडुन त्यांच्या समस्या निकाली काढणा-या निराधार संघटनेच्या अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या नेत्या हिंगणघाट तालुका अध्यक्ष मंगलाताई ठक यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगला ठक यांनी स्वतः फेसबुक वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
मंगला ठक या सामाजिक कार्य करत असताना त्यांना कोरोना वायरसचा संसर्गाची लागण झाल्याचे समोर येत आहे. या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अनेक गरीब परीवाराना भेटून मदत करत होत्या. मंगला ठक यांनी या काळात अनेक कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून गृह विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. त्यामुळे माझ्यासोबत जे होते तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्ता मीनाक्षीताई धाकने यांनी काल मंगला ठक यांची शासनाच्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन घरी जाऊन भेट घेतली. त्याची विचारपुस केली. आणि त्याचा साठी जेवन नेऊन दिल. मीनाक्षीताई धाकने यांनी सांगितल की, मंगला ताई ठक गृहविलगीकरणात आहे. त्याची तबीयेत आता ठिक आहे. ते घरुनच कोरोना वायरसचा उपचार घेत आहे. ते लवकरच बरे हौऊन आपल्या सर्वांचा मीळणार आहे. तरी त्यांच्या मित्र परीवारानी मंगलाताई ठक लवकर बरा व्हावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा.