म्रीग फौंडेशन गुडगाव (वायुनंदना पावर लिमिटेड) यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी 10 लिटरचे 5 कॉन्सेन्ट्रेटर.

51

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली, दि.14 मे,जिमाका :- कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे. यातच काही वेळा रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते. अशावेळी उपयोगी असलेले 10 लिटरचे 5 कॉन्सेन्ट्रेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी मदत म्हणून वायुनंदना पावर लिमिटेड, सीएसआर कंपनी म्रीग फौंडेशन गुडगाव यांचेकडून देणेत आले. आज 5 कॉन्सेन्ट्रेटर कंपनीकडून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, संबंधित कंपनीचे उप महाव्यवस्थापक सीएच व्येंकटराव, व्यवस्थापकीय संचालक के.बी.खन्ना उपस्थित होते.

आपतकालीन स्थितीमध्ये तसेच रूग्णाची परिस्थिती आचानक खराब झाल्यास ऑक्सिजन पुरवठा नसलेल्या ठिकाणी या कॉन्सेन्ट्रेटर उपकरणाचा फायदा होतो असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले. तसेच सदर 5 कॉन्सेन्ट्रेटर जिल्हयासाठी मदत म्हणून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी कंपनीचे उप महाव्यवस्थापक सीएच व्येंकटराव, व्यवस्थापकीय संचालक के.बी.खन्ना यांचे आभार मानले.