काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन.
✒नीलम खरात, प्रतिनिधी✒
मुंबई,दि16मे:- कॉंग्रेस पक्षासाठी एक दुखत बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
खासदार राजीव सातव यांनी करोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होतं. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आलं होतं. त्यांचा करोना अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली होती.
न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल होत. खरंतर, करोनाची लागण झाल्यामुले सातव यांना खूप त्रास झाला. यांच्या प्रकृतीबाबत सर्व राजकिय नेत्यांकडुन चिंता व्यक्त केली जात होती. ते करोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील अशा विश्वास होता पण आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.