आता मुख्यधिकार्‍यांची थेट कोविड रूग्णांच्या घराला भेट; विनाकारण बाहेर फिरणा-यावर लोकांवर कडरी नजर. 

51

आता मुख्यधिकार्‍यांची थेट कोविड रूग्णांच्या घराला भेट; विनाकारण बाहेर फिरणा-यावर लोकांवर कडरी नजर. 

सुपर स्पेरडवर गुन्हे दाखल.

आता मुख्यधिकार्‍यांची थेट कोविड रूग्णांच्या घराला भेट; विनाकारण बाहेर फिरणा-यावर लोकांवर कडरी नजर. 
आता मुख्यधिकार्‍यांची थेट कोविड रूग्णांच्या घराला भेट; विनाकारण बाहेर फिरणा-यावर लोकांवर कडरी नजर.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपुर/ मोवाड:- नागपुर जिल्हातील स्थानिक मोवाड नगरपरिषद अंतर्गत शहरातील वाढती रूग्ण सांख्या पाहता मागील आठवड्यात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मोवाड नगरपरिषदेला भेट दिली, आढावा घेतला व कोविड रूग्णासंबधी काही निर्देश देण्यात आले. त्याच नियमाचे पालन करीत मोवाड न.प. मुख्यधिकारी पल्लवी राऊत यांनी सतत कोरोना बाधीत रूग्णांच्या घरी जाऊन त्यांना समजून सांगत दिवसातुन दोन – तिन वेळा त्या स्वतः व त्यांची पूर्ण टीम कोरोना योध्दा म्हणून काम पाहत आहे. कोविड रूग्ण असलेल्यांची विचारपूस करीत तब्बेतीची माहीती घेत आहे. सोबत खबारदारी घेण्याच्या सुचना देत आहे. तसेच जे रूग्ण सुपर स्पेडर आहे त्यांना वारंवार सांगूनही एकत नाही अश्यांवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे.

मुख्यधिकारी यांनी स्वतः 3 रूग्णांना रंगे हात पकडून त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही केली आहे. तर अनेकांकडुन दंडही वसुल करण्यात आलेला आहे. सर्व अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 वाजता बंद होतात मात्र अत्यावश्यक सोडून जे व्यवसायीक दुकाने खोलुन व्यवसाय करतात अश्या व्यावसायीकांनवर सुध्दा दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. या दंडात्मक कार्यवाही मध्ये दोन कपडा व्यवसायीक, दोन हार्ठावेअर व्यवसायीक तर एक सलुन व्यवसायीक यांचा समावेश आहे.

मुख्यधिकारी पल्लवी राउत यांची कामे पाहत मोवाडवासीयांनी त्यांच्या कामाची सृती करत मोवाड शहर लवकर कोरोना मुक्त होईल अशी आशा जनेतत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कोविड रूग्णावर दहशत निर्माण झाल्याने कोविड रुग्णांनी सार्वजनिक ठीकाणी येणे व  अनावश्यक फीरणे बंद केले आहे. ता. 14 ला शहरात 8 रुग्ण निघाले असून एकूण शहरात सध्या 113 एक्टीव्ह रूग्ण आहे. मुख्यधिकारी यांच्या कामामुळे शहरात कोविड रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. तर दुसकीकडे बाजारात बसणाऱ्यांची संख्या दिवसें दिवस कमी होत चालली आहे. मुख्याधिकारी पल्लवी राऊत ह्या सध्या गावात वाढत्या कोरोना संसर्गाप्रती अत्यंत जागरूकतेने कोविड बाधीत रूग्णावर, मोकाट फीरणारे, तसेच नियम न पाळणर्‍यावर कडवी नजर ठेऊन आहे. स्वच्छतेविषयी माहीती देऊन जनजागृतीही करीत आहे.

मी स्वतः कोविड रूग्णांची यादी तयार करून त्यांच्या घरी जात आहे. त्यांना घरी रहायला सांगत आहे. व नियमीत औषधोपचार करावा व प्रशासनाला सहकार्य करावे . व जे रूग्ण एकत नाही त्यांच्या वर दंडात्मक व कायदेशीर कार्यकाही करण्यात येत आहे. न एकल्यास कोविड सेंटर ला नेण्यात येईल. असे प्रत्यक्षात व मुन्यादीच्या माध्यमाने सांगण्यात येत आहे.
पल्लवी राऊत. मुख्यधिकारी न.प.मोवाड.