वर्धा जिल्हात म्युकरमायकोसिस ने घेतला पहिला बळी; कोरोनावर मात केल्यानंतर झाला मृत्यु.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
वर्धा/आष्टी (शहीद),दि.16 मे:- वर्धा जिल्हातील आष्टी (शहीद) मधून संपुर्ण जिल्हाला हादळवणारी बातमी समोर आली आहे. वर्धा जिल्हा कोरोना वायरसचा मोठा उद्रेक होत असताना वर्ध्यात म्युकरमायकोसिस या आजाराने पहिला बळी घेतला आहे. या आजाराने पेठअहमदपूर येथील शंकर व्यंकटराव ढबाले वय 66 वर्ष यांचा मृत्यू झाला.
काही दिवसापुर्वी शंकर ढबाले यांना कोरोना वायरसने बांधा लागली होती. त्यांच्या मुलाने ताबडतोब अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. आठ दिवस त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते कोरोना वायरस मधून बरे झाल्यावर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र पाच दिवसांत त्यांना म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यांच्या नाकामध्ये मोठ्या प्रमाणात काळी बुरशी तयार झाली होती. ती बुरशी झपाट्याने वाढत डोळा, घसा व कानात पोहोचली. त्यांचा डोळा बंद पडला.
घशाचा व कानाचा भाग पूर्ण खराब झाला. त्यांना तातडीने पुन्हा अमरावतीला नेण्यात आले. मात्र, डॉक्टररांनी त्यांच्यावर उपचार करणे शक्ये नाही. असे सांगत घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. घरी आणताच दोनच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. शंकरराव यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. शेतीवर ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. अशातच त्यांना कोरोणाने ग्रासले. त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना पांढऱ्या पेशी कमी झाल्याने निमोनियासुद्धा झाला होता. त्यांच्या दोन्ही मुलांनी उपचारासाठी अमरावती येथे नेले होते. उसनवारीने पैसे आणून खासगी हॉस्पिटलमध्ये अडीच लाख रुपये खर्च करून त्यांच्यावर आठ दिवस उपचार केले. यामधून शंकरराव ठणठणीत झाले होते.
कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पेठअहमदपूर या गावी आणण्यात आले. घरी पाच दिवस त्यांची प्रकृती चांगली राहिली. मात्र, लगेच त्यांचा डोळा लाल झाला व बंद पडला. डॉक्टरांना दाखवले असता त्यांच्या नाकामध्ये काळी बुरशी प्रचंड प्रमाणात तयार झाली असून, बुरशीमुळे झपाट्याने डोळा, घसा व कानाचे अवयव खराब केले. लागलीच त्यांना अमरावती येथे इरविन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कान, नाक, घसा तज्ज्ञांनी तपासणी केली. तपासणीअंती डॉक्टारांनी ‘शंकरराव वाचणार नाही, त्यांना घरी घेऊन जा’ असा सल्ला दिला.