कळमेश्वर शहरातील हॅन्ड पंपाची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी.
युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर:- ब्राह्मणी शहरातील पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली असून एक दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात काही हॅन्डपंप असून ते कित्येक दिवसापासून नादुरुस्त आहेत. त्या हॅन्ड पंपाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. त्या हॅन्डपंपाची पाणी पिण्यायोग्य नसून इतर कामासाठी वापरला जाऊ शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहर व परिसरातील बहुतांश जलस्रोत दूषित आहे त्यामुळे शहराला पेज व ईटन गोटि जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या शहरातील एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून पाण्याच्या टंचाईमुळे पाणी कपात केली जात आहे. शहरात सध्या 30 हॅन्डपंप आहेत. नागरिकांनी यातील सहा हॅन्ड पंपाचे पाणी वापरतात शहरातील बहुतांश हॅन्ड पंपला पाणी असून ते नादुरुस्त असल्याने त्यातील पाणी वापरणे शक्य होत नाही. या हॅन्ड पंपाची दुरुस्ती केल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकते हे असे नागरिकांनी म्हटले आहे.
हॅन्ड पंपाची दुरुस्ती करण्याबाबत आपण नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याला विनंती केली होती अशी माहिती गंगाधर नागपुरे अरुण वाहने यांनी दिली परंतु पंधरा दिवस होऊ नये प्रशासन जागे झालेले नाही व एकही हँडपंप दुरुस्त केलेला नाही असे त्यांनी सांगितले यावेळी शहरातील पंपाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गंगाधर नागपुरे अरुण वाहने व नागरिकांनी केली आहे.