कोरोना रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आवश्यक.

50

कोरोना रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आवश्यक.

नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून काळजी घ्यावी.

कोरोना रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आवश्यक.
कोरोना रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आवश्यक.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ:- लॉकडाऊनच्या कडक निर्बंधानंतर यवतमाळ जिल्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर कोरोनाणे ग्रामीण भागातही हात पाय पसरणे सुरु केले आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे घरोघरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाले आहे. तर नागरिकांनी काळजी  घेणे महत्वाचे आहे. 

फेब्रुवारी 2021पासून कोरोना वायरस ची दुसरी लाट सुरु झाली पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अतिशय भयानक आहे तर या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांची स्तिथी गंभीर आहे त्यात असंख्य रुग्ण दगावले  आहे. 

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केले एका महिन्यापासून सुरु असणारे  लॉकडाऊन व कडक निर्बंधानंतरही कोरोनाचा विषारी संसर्ग आटोक्यात येत नाही व दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने याकडे लक्ष देऊन आरोग्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागात ( घरोघरी आरोग्य तपासनी सुरु करणे गरजेचे आहे. व यासाठी तातडीने मोहीम राबवून घरातील प्रत्येक सदस्यांचे स्कॅनर द्वारे तथा ऑक्सिजन मिटर द्वारा तपासणी आवश्यक आहे . व तपासणीत आजारी असणाऱ्याना तातडीने विलगीकरण करावे व आशावार उपचार करावे जेणेकरून कोरोनाला थोडयाफार प्रमाणात होईना  अटकाव करता येईल 

तपासणी व उपचार आवश्यक: आजही ग्रामीण भागात व शहरात अनेक जण आजारी आहे परंतु घरगुती उपचार करीत वेळ काढत आहे . परंतु आता मात्र तपासनीसह उपचाराची गरज आहे. व त्यासाठी आरोग्य विभागाने तपासणी मोहीम राबवावी असे तज्ञ व्यक्तींमध्ये बोलले जात आहे.