ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.

49

ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहाण. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.

आर्थिक हितसंबंधाने पोलीस तक्रार घ्यायला करत आहे टाळाटाळ: पिडीत व्यक्तीचा आरोप.

ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.
ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.

वर्धा (प्रतिनिधी):- हिंगणघाट येथील एका व्यक्तीला चार पाच गुंड तरुणाचे गाडीवर जबरदस्तीने बसवुन त्याला एक लॉन मध्ये नेऊन त्याव्यक्तीच्या अंगवर पैट्रोल फेकून तुला जीवंत जाळतो असे म्हणत, दांडक्याने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समुद्रपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. मारहाणीनंतर या व्यक्तीचा पाय तोडुन टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अवैध दारु तस्कर अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उब्दा आणि त्याच्या बरोबर असलेल्या 4 ते 5 गुंडावर समुद्रपुर पोलिसांनी थातूरमातूरच गुन्हा नोंद करुन कुठलीही कारवाई केली नाही अशी माहिती पिढीत व्यक्तीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये केली.

पिडीत व्यक्तीने दिलेल्या माहीत नुसार, मी गणेश कांबळे रा. हनुमान वार्ड हिंगणघाट हे दिनांक 9 मे ला रात्रीच्या सुमारास सारीका कांबळे यांच्या कडे मी उसने दिलेले पाच लाख रुपये मागण्याकरिता गेलो होतो. तर आरोपी सारिका कांबळे यांनी मला शिवीगाळ करत माझा थोबाडीत मारली. त्यानंतर सारिका कांबळेचा भाऊ नितीन गेटमे आणि चंद्रपुर जिल्हातील चार पाच यांनी गाडीवर जबरदस्तीने बसवुन मला एक लॉन मध्ये नेऊन माझ्या अंगावर पैट्रोल फेकून तुला जीवंत जाळतो असे म्हणत, दांडक्याने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली यात माझा पाय पुर्णत निकामी झाला आहे.

ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.
ऊब्दा येथील अनिकेत कांबळे आणि चार पाच गुंडाची एका व्यक्तीला मारहान. पाय तुटला व्यक्ती गंभीर जखमी.

घटनास्थळी असलेल्या योगेश झील्लारे व नागेश यांनी मला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात सोडून दिले. यांची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने पोलिसांनी दि. 10 मे ला रात्री 2 ते 3 च्या सुमारास पिढीत गणेश कांबळेचा बयान घेतला व कांबळेला जास्त मार असल्याने त्याला डॉ. मून व डॉ. लोढा यांच्या रुग्णालयात पुढील उपचाराकरीता हलवण्यात आले. त्यांची प्रकृती जास्त गंभीर बघता गणेश कांबळे यांना खापरखेडा येथील डॉक्टर वर्मा यांच्याकडे रेफर केल्या गेल. दि.11 मे ला त्यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले.

गणेश कांबळे यांचा पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे ते हालचाल करु शकत नसल्याने त्यांनी त्यांच्या भाचाला प्रतिक बुरबुरे पोलीस स्टेशनला तक्रार करायला पाठव पण पोलिसांनी त्याला परत पाठवले आणि कुठलीही कारवाई केली नाह. अनिकेत कांबळे हा मोठ्या अवैध दारुचा विक्रेता असल्यामुळे त्याची आणि पोलिसांची आर्थिक हित संबंध व साठगाथ असल्यामुळे अनिकेत आणि त्याचा गुंडावर कुठलिही कारवाई होत नाही असा आरोप पिढीत गणेश कांबळे ने प्रेस नोटच्या माध्यमातुन केला.