“महामाया गरीब मोफत थाळी केंद्राचे उदघाटन” दररोज 50 गरजू घेऊ शकणार लाभ.

मुकेश शेंडे, तालुका सिंदेवाही प्रतिनिधि
सिंदेवाही :- द सन्स मार्ट सिंदेवाही व मित्र परिवारच्या वतीने कोरोना महामारीत सीण्देवाहीतील गरीब – गरजू नागरिकांसाठी शासन प्रशासनला सहकार्य करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत रोज पन्नास मोफत थाळीचे वितरण करण्यासाठी “महामाया गरीब थाळी केंण्द्राचे उदघाटन सन्स मार्ट, साईक्रूपा होटलच्या बाजूला, शिवाजी चौक सिंदेवाही येथे नुकतेच करण्यात आले.
य़ा उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे निमंत्रक तथा सन्स मार्ट सिंदेवाहीचे मालक अबुलसन लाकडे, प्रमुख अतिथी ग्राम पंचायत समिती लोनवाहीचे सदस्य पंकज नन्नेवार, बहुजन विध्यार्थी फेडरेशन सिंदेवाहीचे अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे, पत्रकार संदीप बांगडे, सुधाकर गजभीये, बामसेफचे प्रा. भारत मेश्राम व बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदु खोब्रागडे उपस्थित होते.
य़ा केंद्रातील मोफत थालीचा लाभ दररोज सकाळी 10.00 ते दूपारी 12.00 य़ा वेळेत मिळणार असून त्याचा लाभ देण्यासाठी सिंदेवाहीकरांनी आपल्या परीसरातील, वार्ड -मोहल्ल्यतील व शहरातील गरजूंपर्यंत माहिती पोहचवुन बसहकार्य करावे, असे आवाहन द सन्स मार्ट सिंदेवाही व मित्रपरिवार यांनी केलेले आहे.