मीरा-भाईंदरमध्ये चक्रीवादळाचा कहर; शेकडो पेक्षा जास्त झाडे पडली, अनेक घराचे नुसकान.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई:- मुंबईत तौक्ते वादळाने मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याचे समोर येत आहे. मीरारोड मीरा भाईंदर मध्ये चक्रीवादळाचा विध्वंसक अनुभव सोमवारी नागरीकानी अनुभवला. शहरात इमारती व राहत्या घरांचे टीनाचे पत्रे चक्रीवादळमुले पत्त्यांसारखे उडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. तर शेकडो पेक्षा जास्त झाडे मुळा पासुन जमिनीवर पडली. पाऊस आणि वारा सुरूच असल्याने रात्री उशिरापर्यंत झाडे पडणे, टीनाचे पत्रे उडणे आदी दुर्घटना सुरूच होत्या. मीरा भाईंदर मधील नागरिकांनी तौत्केच्या रूपाने पहिल्यांदाच चक्रीवादळाच्या भयानक स्वरूपाचा अनुभव घेतला. वादळीवारे आणि तुफान पावसामुळे सकाळपासून पत्रे उडून गेल्याच्या घटना घडत होत्या.