रासायनिक खते, बि, बियानेच्या किंमती कमी करण्यात यावी: वंचितच्या डाॅ. उमेश वावरे ची मागणी.

✒आशिष अंबादे, प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- आज देशामध्ये कोरोना वायरस विषाणूचा फार मोठा प्रदुर्भाव दिसून येत असुन एकिकडे शेतकरी हा कोरोनाशी लढा देत आहे. आज अनेक शेतक-यां कडे पैसा नाही. बॅक चे कृषी कर्ज अजून पर्यत शेतकराना मिळाले नाही हातात पैसा नाही व रासायनिक खते तसेच बि बियानाचे भाव हे 600 ते 800 रू प्रती बॅग वाढले आहे. अश्या वेळेस शेतकराने काय करावे हा गंभीर प्रश्न सर्व शेतकरी बांधवा समोर उभा आहे. शेतीचा हंगाम काही दिवसावर येवून ठेपला आहे. शेतक-यांना त्वरीत कृषी कर्ज उपलब्ध करून दयावेत, खताचे व बियानाचे भाव कमी करण्यात यावे अशे निवेदन वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपवीभागिय अधिकारी यांच्या मार्फत पतंप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार व कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर भारत सरकार यांना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके चारू आटे, विनोद गोडघाङे उपस्थित होते.