बीड जिल्हात जुन्या वादातुन राम, लक्ष्मणची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.18.मे:- बीड जिल्हातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा नागापुर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावा- भावातील जुन्या वादा वरुन दोघा भावांचा खुन करण्यात आला. राम, लक्ष्मण या सख्या दोन भावांचा परमेश्वर साळुंकेने कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. बीड तालुक्यातील नागापूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार बीडपासून जवळच नागापूर हे गाव आहे. येथील राम आणि लक्ष्मण साळुंके या दोन भावंडांचे भावाचे परमेश्वर सोळंके याच्या सोबत माघील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणानंतर पुन्हा परमेश्वर याने शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली अशी विचारणा करण्यासाठी राम आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे भाऊ गेले. यावेळी परमेश्वर साळुंके याने कुऱ्हाडीचे वार घालून राम, लक्ष्मण साळुंके यांचा खून केला. या प्रकरणी पिंपळनेर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.