दोन युवकांकडुन जिओ टॉवर मधील डिझेल चोरीच्या प्रयत्न; एकाला रंगेहात पकडण्यात आले.

49

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधि 

सिंदेवाही:- शनिवार दिनांक15 ला रात्रौ 11 वाजता उमरवाही या गावामधील दोन युवकांनी जिओ टॉवर मधील डिझेल चोरीच्या प्रयत्न करताना एकाला रंगेहात पकडण्यात आले व एक जण पळून गेल्याचे समजले. त्यावेळी दोन युवकांनी आरडाओरडा केल्यानंतर समस्त गावातील लोक तिथे जमा झाले नंतर त्यांची गावातील लोकांनी कसून चौकशी केल्यावर त्या आरोपी ने आम्ही दोघे मिळून डिझेल चोरी करायला आलो व एक जण पळून गेल्याचे संगीतले.

डीझल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी हा राहणार पळसगाव (पिपर्डा ) तालुका चिमूर येथील असून या आरोपीला उमरवाही गावातील पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशन नवरगाव येथील पोलीसांच्या स्वाधीन केले. नवरगाव पोलीस ने डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी वर अप. क्रमांक 197 /2021 अंतर्गत कलम 379 , 511 नुसार दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.