चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत दोन लाख २३ हजार ७५० जणांची कोव्हीड चाचणी; २ लाख निगेटिव्ह.

47

चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत दोन लाख २३ हजार ७५० जणांची कोव्हीड चाचणी; २ लाख निगेटिव्ह.

चंद्रपूर मनपा क्षेत्रात 20 हजार रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात; २ हजार ३९३ रुग्ण भरती.

चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत दोन लाख २३ हजार ७५० जणांची कोव्हीड चाचणी; २ लाख निगेटिव्ह.
चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत दोन लाख २३ हजार ७५० जणांची कोव्हीड चाचणी; २ लाख निगेटिव्ह.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर, ता.17:महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख २३ हजार ७५० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख ७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर उर्वरित २३ हजार ७४३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २० हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या २ हजार ३९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील वर्षी कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच महानगरपालिकेने व्यापक उपाययोजना केल्या. शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी व सैनिकी शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. तसेच विलीगीकरणातील नागरिकाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रयत्नानंतर शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटत आहे. शिवाय व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे. एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती १७ मेपर्यंत २ हजार ३९३ पर्यंत कमी झाली आहे. दरम्यान, ३७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी होती. १७ मे रोजी ती ११०० पर्यंत कमी झाली आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही घटली आहे. खासगी मध्ये भरती संख्या ९८६, मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये ३०७  रुग्ण संख्या आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. एप्रिलअखेर 14 हजार 328 रुग्ण बरे झाले होते. ही संख्या आज २० हजार ९८०  वर पोहचली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.