पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात, स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज: रमेश केराम यांची मागणी

50

पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात, स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज: रमेश केराम यांची मागणी.

पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात -स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज: रमेश केराम यांची मागणी.
पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात -स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज: रमेश केराम यांची मागणी.

 हर्षल घोडे, राळेगाव प्रतिनिधी

राळेगाव:- तालुक्यातील वडकी येथील वार्ड क्र ४ येथे वास्तव करीत असलेले ग्रामस्थ यांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने या पाण्यामुळे त्या वार्डातील ग्रामस्थ त्रासले आहे.दि १६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी गग्रामस्थांच्या घरात शिरले. जोराचा पाऊस आला की रोडचे संपूर्णतः पाणी हे ग्रामस्थांच्या घरात शिरत असल्याने या पाण्याचा नाहक त्रास वार्डातील ग्रामस्थांना सोसावा लागतो.

वार्ड क्र ४ येथे राहत असलेले गणेश राजूरकर, श्रीधर केराम, रमेश केराम यांच्या घराजवळ रोडलगत असलेल्या नालीचे व संपूर्ण पावसाचे पाणी यांच्या घरात शिरत असल्याने घराजवळ पाण्याने गंगेचे स्वरूप प्राप्त होते. वार्डातील ग्रामस्थांनी या पाण्याबाबत अनेकदा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तसेच वार्डाचे सदष्य यांना या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकदा विनंती केली पण ग्रामस्थांच्या विनंतीला कोणतेच मान न देता अनेकदा टोलवाटोलवीची उत्तरे त्यांना मिळाली त्यामुळे आता वरिष्ठ अधिकार्यांनीच या घरात शिरत असलेल्या पाण्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी वार्ड क्र ४ मधील श्रीधर केराम, रमेश केराम, विवेक केराम, गणेश राजूरकर, रुदरेश केराम, जनार्दन राजूरकर यांनी केली आहे.