त्रिमूर्तीचा पाटाळा राळेगाव घाटावर अवैध रेती उपसाचे धुमाकूळ; रोजच रात्रि करीत असतात धुमाकूळ.

44

त्रिमूर्तीचा पाटाळा राळेगाव घाटावर अवैध रेती उपसाचे धुमाकूळ; रोजच रात्रि करीत असतात धुमाकूळ.

त्रिमूर्तीचा पाटाळा राळेगाव घाटावर अवैध रेती उपसाचे धुमाकूळ; रोजच रात्रि करीत असतात धुमाकूळ.
त्रिमूर्तीचा पाटाळा राळेगाव घाटावर अवैध रेती उपसाचे धुमाकूळ; रोजच रात्रि करीत असतात धुमाकूळ.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (वरोरा):- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे वरोरा वणी रोडवरील वर्धा नदीवरील पाटाळा राळेगाव रेती घाट पाटाळा व भद्रावती येथील अवैध रेती काढणाऱ्या त्रिमूर्ती करिता सोन्याची खान बनली आहे.

संपूर्ण जगावर कोविडचे महाभयंकर सकट घोघावत आहे. अक्षरशः मृत्यूचे ताडव सुरू असल्याने जनता जीव मुठीत घेऊन जगत आहे.लोकांचे व्यापार ठप्प झाले आहे.पण या जीवघेण्या महामारीतही अवैध रेती तस्कर मात्र सैराट झाले आहे. आज घडीला पाटाळा घाटातून रेतीची विनापरवाना ओव्हरलोड वाहतूक होत आहे. हा गोरखधदा मागील दोन महिण्यापासून अविरतपणे सुरू आहे व विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर माजरी पोलीस स्टेशनची इथेच 24 तास पोलिसांची चौकी आहे जी वणी मार्गाने येणाऱ्या अवैध दारू माफियावर करडी नजर ठेवतात मात्र त्याच्या नजरे मध्ये पाटाळा घाटातून निघणारी अवैध रेतीचे ट्रक,हायवा दिसत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.विशेष म्हणजे आजतागायत एकाही वाहनावर कारवाई झाली नसल्याने पोलीस व महसूल प्रशासनावर संशय बळावला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना च्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असताना दुसरीकडे मात्र रेती तस्कर कोरोना वर भारी पडल्याचे चित्र नजरेस पडत आहे.

सध्या तालुक्यातील रेती घाट तस्करांसाठी वरदान ठरत आहे. वर्धा नदीवरील मोजक्याच घाटाचे लिलाव झाले आहे मात्र लिलाव न झालेल्या पाटाळा, राळेगाव येथील घाटावरून अनेक रेती तस्करांनी या घाटावर धुडगूस घालून रात्रोच्या वेळेस पोकलँडद्वारे रेती उपसा करण्याचे सत्र बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. या घाटातील रेती बारीक व चांगल्या दर्जाची असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे पाटाळा, भद्रावती येथील त्रिमूर्ती अवैध रेती तस्कर सैराट झाले आहे.

आज घडीला मोठ्या तस्करासह लहान तस्करांनी देखील वर्धा नदीवरील घाटाकडील वाट धरली आहे. दररोज पोकलँड द्वारे रेती काढून हायवा, ट्रक मधून रेतीची बेधडकपणे वाहतूक सुरू आहे. काही हायवातून रेतीची ओव्हरलोड चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रति हायवा २० ते २५ हजार रुपये मोजावे लागत असल्याने या फुकटच्या रेतीवर पाटाळा,भद्रावती येथिल तस्कर चांगलेच मालामाल झाले आहे. विशेष म्हणजे या घाटावरून खुलेआम रेतीची तस्करी होत असताना सुध्दा हा प्रकार पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत असूनही झोपेचे सोंग घेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हाकेच्या अंतरावरून चोरटी वाहतूक होत असून देखील पोलीस व महसूल विभागाने डोळ्यावर पट्टी बांधल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. हा घाट जनू रेती तस्करासाठीच त्यामुळे या घाटावरून होणाऱ्या वाहतुकीला एकंदरीत बळ तर मिळत नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.