कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा आज शुभारंभ; येथील नागरिकांच्या मागणीला मिळाले यश.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
कन्हान :- कन्हान शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांनी संबंधित अधिका-याशी चर्चा करून कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली असता सोमवार (दि.१७) ला डोणेकर सभागृह कन्हान येथे नप नगराध्यक्ष करूणाताई आष्टणकर, मनोनीत नगरसेवक नरेश बर्वे यांचा हस्ते व पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला.
कन्हान शहर व परिसरात कोरोना च्या दुस-या लाटीमुळे गोर गरिबांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असुन कित्येक तरी लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि कन्हान पासुन नागपुर चे अंतर दुर असल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या अगोदर कित्येक तरी लोकांचा मृत्यु झाला. कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातल्या काही सामाजिक कार्यकत्यासह, संजीवनी कोव्हिड केअर सेंटरचे डायरेक्टर सौ. शीतल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने सोमवार (दि.१७) मे २०२१ ला दुपारी १२ वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील विजय मॉर्केट येथील डोणेकर सभागृह येथे कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नामनिर्देशित नगरसेवक नरेश बर्वे यांचा हस्ते व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा उपस्थितीत संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला. या कोविड रूग्णालयात १० ऑक्सिजन युक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली असुन डॉक्टर वसीम हुसैन व डॉ. सुष्मीता शहा यांच्या देखरेखीत हे कोविडालय सुरू राहणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे , कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, माजी नगरसेवक अजय लोंढे, उदयसिंह उर्फ गज्जु यादव, आकीब सिद्धिकी, प्रविण गोडे, ॠषभ बावनकर, सौरभ डोणेकर, तुषार फडणवीस, शुभम चौधरी, रोहित बर्वे सह नागरिक उपस्थित होते.