राज्यातील स्पर्धा परीक्षेत वयोमर्यादा वाढवून दयावी; प्रशांत रागीट यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

60

राज्यातील स्पर्धा परीक्षेत वयोमर्यादा वाढवून दयावी; प्रशांत रागीट यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

 स्पर्धा परीक्षेकरीता वयोमर्यादा वाढविण्याची शासनाकडुन अपेक्षा.

राज्यातील स्पर्धा परीक्षेत वयोमर्यादा वाढवून दयावी; प्रशांत रागीट यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
राज्यातील स्पर्धा परीक्षेत वयोमर्यादा वाढवून दयावी; प्रशांत रागीट यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा 18 मे:- मागील दोन वर्षापासून कोविड -19 या महामारिणे संपूर्ण देशाला ग्रासले असून त्याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरू शकले नाही. वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आपल्या स्वप्नाचा मार्ग मोकळा करायला संधी उपलब्ध नसल्याने लाखो तरुण स्पर्धेची तयारी करत असुन वयोमर्यादा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात नौकरीची संधी उपलब्ध होईल या आशेने हे युवक जिद्दीने अभ्यास करीत आहेत. परंतु कोविड -19 या महामारीने त्यांच्या मार्गात अडथळा आल्याने मागील 2 वर्षा पासून कोणतीच सरळ सेवा भरती होऊ शकली नाही.अशावेळी जे युवक स्पर्धेची वर्षानुवर्ष तयारी करीत असुन मागील 2 वर्ष पासून कोणतीच भरती होऊ न शकल्या मुळे त्यांची वयोमर्यादा देखील समाप्त होत आहेत. तरी शासननाने त्वरीत 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवून सर्व युवकांना दिलासा दयावा अशी मागणी प्रशांत रागीट यांनी केली आहे.