रासायनिक खते राक्षसी दरवाढ रद्द करावी घनसावंगी शिवसेना, युवासेनाच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन.

✒ आदेश घाडगे, प्रतिनिधी ✒
घनसावंगी:- नुकतीच रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे खताच्या बॅग मागे 50 ते 60 टक्के एवढी प्रचंड मोठी अनपेक्षित राक्षसी दरवाढ करून सरकारने संकटात असलेल्या शेतकन्यांना आणखी संकटाच्या खाईत लोटले आहे ही बाब गंभीर व दुर्देवी असुन सहन न होणारी ही खतांची दरवाढ अन्यायकारक असुन शेती व शेतकरी यांना न परवडणारी आहे .देश आणि देशाचा शेतकरी कमालीचा संकटात आहे याची जाणीव ठेवुन जाहीर केलेली राक्षसी दरवाढ 100 टक्के मागे घ्यावी. अन्यथा 8 दिवासाच्या प्रतिक्षेनंतर या दरवाढीचा निषेध म्हणुन घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गावात या दरवाढीचा निषेध म्हणुन ग्रामपंचायतसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. याची नोंद घ्यावी हि विनंती या सामुहिक आंदोलन काळात होणान्या सर्व चांगल्या – वाईट परिणामाची जबाबदारी शासन -प्रशासनावर राहील. यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.