बल्लारपूर पोलिसांनी कारवाई : गांजाची तस्करी करतांना 2 आरोपींना अटक 1,64,400/- रु चा मुद्देमाल जप्त.

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर:- पोलीस ठाणे अंतर्गत सपोनि विकास गायकवाड व पोशी अजय यांना गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली की, 16 मे 2021 रोजी बल्लारपूर येथून चंद्रपूर येथे एक इसम गांजा घेऊन जाणार आहे व एक इसम सुभाष वार्ड बल्लारपूर येथे गांजा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सपोनि गायकवाड, मुलाणी, गिरीश व स्टाफ, तसेच सपोनि रासकर, चेतन टेम्भुरने व स्टाफ अशा 2 टीम तयार करून दोन्ही ठिकाणी रेड केली असता 4.300 की.ग्रा वजनाचा गांजा अंदाजे किंमत 42,500/- रु तर पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल अंदाजे किंमत 1,02,500 रु चा माल जप्त करण्यात आला याप्रकरणी राजेश मदनलाल जोशी वय-65 वर्ष, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर यांना अटक करण्यात आली व अप क्र 566/2021 कलम 8, 20(ब)(2) NDPS नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर याच मोहिमेअंतर्गत दुसऱ्या घटनेत 6.240 कि. ग्रा वजनाचा गांजा अंदाजे किंमत 61,900/- रु याप्रकरणी लालचंद गणेश केशकर वय – 59 वर्ष, सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली असून त्यांचे विरुध्द अप क्र 565/2021 कलम 8 20(ब)(2) NDPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणात एकूण 1,64,400/- रु चा माल जप्त करण्यात आला सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, रमीझ मुलाणी, प्रमोद रासकर, चेतन टेम्भुरने, ठाकरे, गिरीश, सुधाकर वरघणे, राजेश, बाबा नैताम, शरद कुडे, राकेश,प्रवीण, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, गणेश पुरडकर, शेखर मथनकर, किशोर, संध्या आमटे, सीमा पोरते ई नी कारवाईत सहभाग घेतला.