पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

68

पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

समाजसेवक डॉ. बिनु वर्गीस यांनी केला रॅकेटचा पर्दाफाश.

पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.
पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

मुंबई/✒️✒️ठाणे प्रतीनीधी✒
मुंबई/✒️✒️ठाणे :- खाजगी चाचणी केंद्रातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालय बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटनेनंतर आता अशीच बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश समाजसेवक डॉ. बिनु वर्गीस यांनी केला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने अफसर तेजपाल मंगवाना याला अटक केली आहे. मात्र या रॅकेटमध्ये पालिका अधिकारी आणि अन्य लोकांचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. 

खाजगी लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचण्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह देण्याचा सावळागोंधळ करण्यात येत होता. मात्र आता पालिकेच्या वाडिया रुग्णालयात आता अशा प्रकारचे निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समाजसेवक डॉ. बिनु वर्गीस याना मिळाली. या माहितीची खातरजमा करीत डॉ. वार्गिस यांनी कोरोनाच्या पॉझिटिव्ह रिपोर्ट हे निगेटिव्ह बनवून घेतले. त्यांनी दोन मृतदेहाचे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळवले. एवढेच नाही तर मृतक हे कोरोनाची बाधा झालेले रुग्ण होते. त्यानंतर अन्य चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निगेटिव्ह रिपोर्ट पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून आरोपी अफसर तेजपाल मंगवाना याच्या माध्यमातून मिळवले. अफसर हा परिचर म्हणून वाडिया रुग्णालयात सेवेत आहे. दोन मृत आणि चार जिवंत लोकांचे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बनावट मिळवल्याने डॉ बिनु वर्गीस याना खात्री पटली. त्यांनी सदरची बाब गुन्हे शाखा युनिट-५ च्या वरिष्ठ अधिकारी याना दिली. त्यानुसार युनिट-५ चे पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी पथक बनवून सापळा रचला. आणि बनावट आरटी-पीसीआर चाचणीचा बनावट रिपोर्ट देताना आरोपी अफसर तेजपाल मंगवाना याला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अवघ्या १२०० रुपयांमध्ये पालिकेच्या वाढिया रुग्णालयातून बनावट आरटी-पीसीआर रिपोर्ट देण्यात येतात आणि यात रुग्णालयाचे अन्य अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागाचा संशय बळावला आहे. तर अशाप्रकारे आतापर्यंत किती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ते रुग्ण वावरून किती लोकांना संक्रमित केले असेल याबाबत विचार होणे गरजेचे आहे. गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस पथक या रॅकेटमध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे याबाबत चौकशी करीत आहेत.