शहराची अस्मिता घालवून, लाज वेशीवर टांगनाऱ्या पांढऱ्या कपड्या मधील “कमिशनखोरांचा” बंदोबस्त करा.
ब्रम्हपुरी नगर परिषदचे नगरसेवक सागर आमले यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे चौकशी ची मागणी.

✒ अमोल माकोडे ✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतीनिधी
ब्रम्हपुरी :- एकेकाळी शैक्षणिक व संस्कृतीदृष्टीने नावारूपास आलेले शहर म्हणून ब्रम्हपुरी शहराने आपली ओळख निर्माण करून याच शहराने उच्चस्तरीय अधिकारी व कर्मचारी देणारे व शिक्षित संस्कारित युवा पिढी देणारे शहर होते पुढे जाऊन हेच शहर राजकीय दृष्टया प्रगत होऊन मोठं मोठे राजकीय मातंबर उदयास आले आणि पाहता पाहता शहराचा चेहरा मोहरा बदलला संस्कृत शहर गुन्हेगारीचा अड्डा बनला.
शहरात जमीन खरेदी-विक्री व्यवसाय, आरक्षित जागेला अनारक्षित करणे,कृषक जागेला अकृषक करणे, न्यायप्रविष्ट असलेला गुंठेवारी प्रकरण, जिल्हाबंदी असतांना अवैध/बनावट दारूचा महापूर, रात्र-दिवस बिनधास्त पणे चालणारी अवैध वाळू तस्करी, जुगार-सट्टा, विविध अवैध मार्गाने कमिशन मिळवून देणारे व्यवसाय असल्या विविध प्रकरणाने ब्रम्हपुरी शहराची प्रतिमा संपूर्ण राज्यात मलीन होत असून राजकीय पाठबळ आणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कृपेने हे सर्रास पणे चालत असल्याचे शहरातील जनभावनेतून आणी वारंवार वृत्तपत्रातून झळकणाऱ्या शहराच्या बदनामीकारक बातम्यातून निदर्शनात येत असल्याने शहरातील अवैध धंद्यात गुंतलेल्या पांढरपेशी कमिशनखोर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात याव्या व योग्य न्यायिक कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा अशयाचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून हे सर्व धंदे कुण्या कमिशनखोर नेत्याच्या सहकार्याने चालत असल्याचे जनमाणसाच्या भावनेतून निदर्शनात येते. स्थानिक प्रशासना कडून अवैध धंद्यावरील कारवाई केवळ वरिष्ठाना कागदोपत्री दाखविण्याचा प्रयत्न केल्या जातो यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे त्या-त्या परिसरात वर्चस्व निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यास प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही व तक्रार कर्त्यासच त्रास दिला जातो, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबत तक्रार दाखल केल्यास त्यांच्या तक्रारी ला अधिकारी वर्गा कडून कराची टोपली दाखवल्या जाते.
एकेकाळी शैक्षणिक, पर्यावरण पूरक आरोग्य विषयक शांत शहर म्हणून सर्वांच्या पसंतीचे असलेले शहर अवैध धंद्याचे केंद्र बिंदू बनले, असून शहराची अस्मिता घालवणाऱ्या त्या कमिशनखोर पांढरपेशी गुन्हेगार नेत्यांना व त्यांना पाठीशी घालून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर उच्च स्तरीय विशेष पथकाद्वारे चौकशी लावून ब्रम्हपुरी शहराची मलीन होणारी प्रतिमा शाबूत राखावी व शांतता प्रस्तापित करावी अशा अशयाचा निवेदन ब्रम्हपुरी नगर परिषदचे नगरसेवक सागर सुरेश आमले यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते यांना केलेली आहे.