शिवसेना गडचिरोली तर्फे कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णाचा नातेवाईकाना चहा- बिस्कीट व नास्ता नि:शुल्क वाटप.
गडचिरोली -शिवसेना गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे 6 वा दिवस.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णाचा २२५ च्या वर नातेवाईकाना चहा- बिस्कीट व नास्ता,कोंमप्लान नि:शुल्क वाटप करन्यात आले आज दिनांक-२० मे २०२१ ला सकाळी ८.३० वाजता वाटप करण्यात आले.या साहवा दिवशी झालेल्या उपक्रमाचे प्रायोजक गड़चिरोली विधानसभा शिवसेनेचे संघटक नंदु क़ुमरे हे होते व आयोजक ज़िल्हाप्रमुख विजय शृंगारपवार. यावेळी शिवसेनेचे उपज़िल्हा प्रमुख राजु कावळे, तालुकाप्रमुख गजानन नैताम, शिव शृंगारपवार उपस्थित राहून चहा- बिस्कीट व नास्ता वाटप करण्याकरीत सहकार्य केले.