स्वंयरोजगार मार्गदर्शनाकरीता भंडारा या कार्यालयामार्फत  ऑनलाईन वेबीनार.

64

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 21 मे 2021 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत स्वंयरोजगारासंबधी विविध शासकीय योजनांबाबत व्यवसाय समुपदेशन, मार्गदर्शन कार्यक्रम वेबीनारच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या वेबीनारमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वेबीनारमध्ये बँक ऑफ इंडीया पुरस्कृत स्टार स्वंयरोजगार प्रशिक्षण केंद्र भंडारा संचालक सुजीत बोदेले यांचे बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवावे याबाबत ऑनलाईन समुपदेशन होणार आहे. युवक, युवतींनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुगल मिट या ॲपचा उपयोग करावा. https://meet.google.com/gcx-rwfa-cut या लिंकचा उपयोग करुन 21 मे 2021 रोजी दुपारी 12 ते 1 वाजतापर्यंत ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथे 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा सहाय्यक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी केले आहे.