शासकीय कोविड केअर सेंटर सावनेर ला आवश्यक साधनसामुग्री भेट.

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतीनिधी
सावनेर-20 मे:- सावनेर क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आढळतो आहे.त्या दरम्यान मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी व उपचार सावनेर कोविड केअर सेंटर येथे होत आहे.त्यामुळे सदर तपासणी व उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा कोरोनाविषाणू पासून बचाव होण्याकरिता आज दि.20 मे ला कैलाश महादेवराव अडकिने-(CA) सोनखांब यांनी कोविड केअर सेंटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सावनेर ला अत्यंत आवश्यक अशी सामुग्री-पी.पी.ई.किट-25 नग, ट्रिपल लेअर मास्क-300 नग, एन-95 मास्क-50 नग,हॅन्ड ग्लोज-200 नग,सॅनीटायझर-5 ली. भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी डॉ.संदीप गुजर,विनोद बोबडे,अनिल अडकिने,गुणवंत ठाकरे,किशोर महाजन व पॅरामेडिकल स्टाफ चे कर्मचारी उपस्थित होते.