गडचिरोली एटापल्ली जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक; 13 नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात सी 60 जवानांना यश.

67

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
गडचिरोली :- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात आज सकाळी सी-60जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60 जवानांना यश प्राप्त झाले आहे.

पोलिस-नक्षल चकमक जवळपास दीड तास सुरु होती पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षल घटना स्थळावरून पसार झाले असुन घटनास्थळी शोधमोहीम केले असता ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा नेमका आकडा कळू कडू शकला नाही .त्यामूळे गडचिरोली च्या इतिहासात दुसरी मोठी चकमक आहे.

सी-60 जवानांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगल परीसरात तेंदूपत्ता हंगामासंदर्भात नक्षलवाद्यांनी बैठक आयोजित केली असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार जवानांनी शोधमोहीमे दरम्यान कसनसुर पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या पैडीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यानी पोलिस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला पोलिस जवानानी नक्षल्याना जशास तसे प्रतिउत्तर देत यात 13 नक्षल्याना ठार करण्यात सी 60 जवानांना मोठे यश प्राप्त झाले आहे.

या चकमकीत कसनसुर दलमचें सर्व नक्षल असुन पूर्ण दलम नष्ट करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी जंगल परिसरात सर्चिग आपरेशन अधिक तीव्र केले असुन मृत नक्षल्यांची संख्या वाढन्याची शक्यता आहे.