आंबुलगा येथील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मुखेड :- कोरोना संसर्गात फ्रंट लाइन वर्कर असलेले डॉक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच शैक्षणिक विभागाचे शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी उत्कृष्ट कामे केल्याने कोरोना हद्दपार होत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विरोधात दिलेला लढा व केलेली सेवा उल्लेखनीय आहे. ह्या महामारीच्या काळात आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या स्वतःच्या जिवाची परवा न करता, कोरोना रुग्णांना उपचार देत आहेत लसीकरण करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा ग्रामपंचायतीच्या वतीने आंबुलगा येथील आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातील आंबुलगा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हाणमंते, ए.एन.एम सौ.गोणे मॅडम, एम.पी.डब्लू. सूर्यवंशी, शिक्षिका धमने मॅडम, अंगणवाडी शिक्षिका सुरेखा अंबुलगेकर, उपकेंद्राच्या सेविका सौ. शांताबाई, यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी सरपंच प्रतिनिधी हुल्लाजी मामा रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील, प्रतिष्ठित व्यापारी बाबूसावकार उलीगडे, युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, मुन्ना मोतेवार आदी जणांची उपस्थिती होती.