जळगाव दिराने पुतण्यासमोर घातले वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव.

58

जळगाव दिराने पुतण्यासमोर घातले वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव.

जळगाव दिराने पुतण्यासमोर घातले वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव.
जळगाव दिराने पुतण्यासमोर घातले वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव.

✒जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव,दि.21 मे:- जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण जळगाव हादळल आहे. परीवाराच्या वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव करत तिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली. योगिता मुकेश सोनार वय 39 वर्ष असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार वय 38 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मृत महिलेच्या मुलासमोर ही घटना झाल्याने त्याने पोलिसांना ही घटना सांगितली.

मयत योगिता सोनार या मयूर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. त्यावरून त्याचा व वहिनीचा वाद झाला अन् संतापलेल्या दीपकने पलंगामागील कुऱ्हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात घाव घातले. यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल पुढील तपास पोलीस करत आहे.