बल्लारपूर पोलिसांनी पकडली 1 लाख 50 हजाराची देशी दारू; दोन आरोपी गजाआड.

63

बल्लारपूर पोलिसांनी पकडली 1 लाख 50 हजाराची देशी दारू; दोन आरोपी गजाआड.

बल्लारपूर पोलिसांनी पकडली 1 लाख 50 हजाराची देशी दारू; दोन आरोपी गजाआड.
बल्लारपूर पोलिसांनी पकडली 1 लाख 50 हजाराची देशी दारू; दोन आरोपी गजाआड.

सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात अवैध दारू तस्करी नित्याचाच विषय झाला की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे मागील 10 दिवसाचा विचार केला तर दर तिसऱ्या दिवशी अवैध दारू पोलीस विभागांनी पकडल्याचे वृत्त आहे जिल्हा बंदी असतांना अवैध दारू तस्करी होतेच कशी ? सद्यस्थिती कोरोनाचा संक्रमण काळ असतांना पोलीस विभाग नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेत असतांना दारू तस्कर नवनवीन क्लुप्त्या लढवून दारूची तस्करी करतांना दिसून येतात.

बल्लारपूर पोलिसांनी आज शनिवार रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत सपोनि विकास गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, बामणी येथे शुभम बहादुरे हा आपले घरा जवळ दारू आणून त्याची विल्हेवाट लावत आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शन खाली त्यावेळी सपोनि विकास गायकवाड, रमिझ मुलाणी, Psi चेतन टेंभुर्णे व त्यांचे टीम ने बामणी येथे प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे. 1)आं.कि. 1,50,000/- रु. की चे देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या एकूण 10 पेटी प्रत्येकी पेटी मध्ये 100 नग असे एकूण 1000 बॉटल मिळुन आल्या असा एकूण 1,50,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.

आरोपीची नावे 1) शुभम बहादुरे, वय(24) वर्ष रा. वार्ड क्रं 4, बामणी, ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर 2) पारस निषाद, वय (30) शिवनगर बामणी, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर सदरचा माल व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 603/2021 मदाका कलम 65(ई)प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शन खाली सदर कारवाही सपोनि विकास गायकवाड, रमिझ मुलाणी, Psi चेतन टेंभुर्ने, पोहवा आनंद परचाके, रणविजय ठाकूर, Npc सुधाकर वरघने, शरद कूडे Pc दिलीप आदे, शेखर माथणकर यांनी केली आहे.