शिवसेनेची आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक.

16

शिवसेनेची आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक.

शिवसेनेची आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक.
शिवसेनेची आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची उन्हाळी फसल निघालेली आहेत. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर धान विकण्यास येणार आहे. परंतु आदिवासी महामंडळ तर्फे फक्त १० ते १२ क्विंटल प्रति ऐकरी घेणार असल्याची माहिती मिळताच छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली.

शेतकर्याकडून एवढ्या कमी प्रमाणात धान्य खरेदी केल्यास शेतकऱ्याला मिळणाऱ्या कमी पैशात शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन होणार नाही. शेतकऱ्यांना पावसाळी फसली साठी धान बियाणे, खत खरेदी करणे, विजेची बिल भरणे व इतर व्यवहार चे नियोजन होऊ शकत नाही, अश्या तक्रारी शेतकरी वर्गानी शिवसेना माजी महिला संघटिका छायाताई कुंभारे यांच्याकडे केली होती. याबाबत शिवसेनेने यापूर्वीच आदिवासी विकास महामंडळ ईशारा दिला होता. याबाबत कोणतीही दखल आदिवासी विकास महामंडळकडून न घेतल्याने छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली. एक निवेदन महामंडळचे व्यवस्थापाक कोटलावार यांना देऊन चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यां कडून प्रति हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल धान खरेदी करावे असे आदेश देण्यात यावे.तसेच जिल्ह्यात सर्वच ठिकाणचे धान खरेदी केंद्र ही त्वरीत सुरू करावे अशी मागणी धरून सुमारे एक तास चर्चा केली. येत्या एक दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू करू तसेच हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी करू असे आश्वासन आदिवासी विकास महामंडळाने दिले. परंतु हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल खरेदी करावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना माजी महिला संघटिका छायाताई कुंभारे,अश्विनी भांडेकर यांनी दिला.