गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मास्क, सॅनिटायझर वाटप.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- संघनक क्रांतीचे जनक, भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव जी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मागील 27 दिवसा पासून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु रुग्णालयात नातेवाईकाच्या आरोग्य ची काळजी घेत आज सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सुरेशजी लडके, नागपुरे साहेब, चंद्रकांत शिवणकर, राजेंद्र उरकुडे, संजय चन्ने, गौरव एनप्रेरेडीवार, तोफिक शेख, कुणाल ताजने, रवी गराडे, प्रतीक बारसिंगे, समीर ताजने, दिलीप चोधरी सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.