यवतमाळ जिल्हा मोठ्या प्रमाणात रेती तस्कर सक्रीय. RTI कार्यकर्ताला मारहान, नग्न व्हिडिओ बनवुन वायरल.

✒️साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒️
यवतमाळ:- आज संपुर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला उत आला आहे. मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करुन हे तस्कर मालामाल होत आहे तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते चंदन हातगडे याने या रेती तस्करी विरुद्ध आवाज उठवला तर त्याचे अपहरण करुन पांढरकवडा मार्गावर असलले गॉरेज मध्ये नेऊन त्याला मारण्यात आले व त्याचे नग्न व्हिडियो बनवुन माहिती अधिकार कार्यकर्ते चंदन हातगडे यांची बदनामी होईल म्हणून सोसल मिडिया वर वायरल करण्यात आले होते.

एक प्रकारे या गुंड रेती माफीयानी यवतमाळ पोलिसांना आव्हान दिल होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक भुजबळ शनिवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथेच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी संधी दिली जाऊ नये, दोन दिवसांत ते लॉकअपमध्ये दिसावे असा अल्टिमेटम यवतमाळ शहर व अवधूतवाडीचे ठाणेदार तसेच तेथील शोध पथकांना दिला आहे. या आरोपींच्या शोधाची जबाबदारी यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्यावरही सोपविण्यात आली आहे. 

यवतमाळ येथील रेती माफियाने 16 कोटी रुपये भरून 12 रेतीचे घाट घेतले गेले. परंतु, त्याआड मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीचा उपसा केला जात आहे. यातील बहुतांश घाटांमध्ये राजकीय भागीदारी असल्याने या रेतीमाफियांना राजकीय अभयही आहे. हे अभय असल्यानेच प्रशासनाचेही आपल्याला संरक्षण मिळेल, असा विचार करून आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्याचे नग्न व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आले. मानवाधिकाराला आव्हान देणाऱ्या या घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी एसपींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतरही प्रशासनाला गृहित धरणाऱ्या रेती माफियांकडून अटक टाळण्यासाठी राजकीय संरक्षण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here