*”भीमछाया सांस्कृतिक केंद्र”*, कालीना, मुंबई ही जागा वास्तविक पाहता समाजाच्या मालकीची आहे हे सर्वश्रुत आहे. सदर जागेच्या मागील बाजूस एका विकासकाचा प्रकल्प केवळ तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला होता. त्यासाठी समाजाच्या जागेची आवश्यकता होती त्याशिवाय तो प्रकल्प पूर्ण होणार नव्हता असे असताना विकासकाने शक्कल लढवून त्या रस्त्याची तशी मागणी भीमछाया सांस्कृतिक केंद्राच्या संस्थापकीय अध्यक्ष महोदयांकडे केली होती. मान.अध्यक्ष महोदयांनी, पूर्ण विकास करून द्यावा त्यानंतरच विकासकाला त्याच्या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता देण्यात यावा असा ठराव काही सदस्यांचा विरोध असतानाही घेण्यात आला.

असे असताना सद्यस्थितीत संस्थेच्या एकंदरीत जागेवर संबंधित विकासकाकडून कोणत्याही स्वरूपाचे अथवा कुठल्याही पद्धतीचे काम न करता विकासकाच्या प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता ठरलेल्या कराराच्या अगोदरच देऊन टाकण्यामागे कारण काय असू शकते? किंवा सदर जागा समाजाच्या मालकीची असताना तिचे मूल्य मापन करताना किंवा विकताना समाजाला विश्वासात घेतले का ? यासारख्या अनेक शंका निर्माण होतात. अनेक प्रश्न उपस्थित होतात.

*१) केंद्राच्या जागेवर कोणताही नव्याने बांधकाम अथवा विकास झालेला नसताना सभासदांना विश्वासात न घेता संबंधित विकासकाला रस्त्यासाठी जागा का देण्यात आली ?*

*२) संबंधित विकासकाच्या मागणीपेक्षाही अधिक जास्त जागा का देण्यात आली ?*

*३) देण्यात आलेल्या जागेवर विकासकाने काही जागा रस्त्यासाठी घेतली तर उर्वरित जागेवर विकासकाने लोखंडी खांब मारुन उगाच जागा अडवून ठेवण्यामागे काय कारण असू शकते ?*

*४) सदर जागा ही समाजाच्या मालकीची असताना या एकंदरीत प्रकरणामध्ये आपल्या चाणाक्ष बुद्धीने समाजाला अंधारात ठेऊन अति तातडीने काही जागेचा व्हिलेवाट लावण्यामागे कारण काय असू शकेल ?*

५) *सदर जागा किती किंमतीमध्ये विकण्यात आली ? त्यापैकी किती रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात आली ? किती रक्कमेचा कशा प्रकारे वाटप करण्यात आला हे सांगू शकाल का ?*

६) *समाजाच्या मालकीची जागा विकण्याचा अधिकार तुम्हाला समाजाने दिला का ?*

७) *संस्थेच्या खात्यावर जमा केलेली रक्कमेचा निदान या विभागातील बौद्ध विहारांना समान वाटप करणार का ?*

८) *सदर पैशाचा अथवा सदर जागेचा किंवा त्या जागेतून उत्पन्न मिळालेल्या पैशाचा समाजाला कोणत्याही प्रकारे फायदा होत नसेल तिचा एक ठराविक व्यक्तींना फायदा होत असेल तर ती जागा समाजाची कशी म्हणावी ?*

९) *सदर समाजाच्या जागेतून व्यावसायिकरीत्या आजपर्यंत किती रक्कम जमा झाली ? तिचा विकास अथवा देखभाल करण्यासाठी किती रक्कम खर्च झाला ? शासकीय फंडातून अथवा अन्य मार्गाने किती रक्कम मिळविण्यात यश आले. हे सांगू शकाल का ?*
१०) *सर्वात मोठी बाब म्हणजे समाजाच्या जागेवर ठाण मांडून बसलेल्या संस्थेमध्ये समाजाची कोणतीही व्यक्तीला नव्याने सभासद कोणत्या भीतीपोटी केले जात नाही ? याविषयी समाजाला कारण सांगू शकाल का ?*
११) *सदर संस्था स्थापन झाल्यापासून संस्थेचा अध्यक्ष पद हा एकाच व्यक्तीला कायमस्वरूपी समाजाने ठराव करुन दिला आहे का ? की समाजामध्ये त्या पदाचा लायक व्यक्ती नाही ?*

यासारखे असंख्य प्रश्न उपस्थित होतात. कारण *भीमछाया सांस्कृतिक केंद्र* ही जागा कोण्या वयक्तिक व्यक्तीच्या मालकीची नसून ती समाजाच्या मालकीची आहे. आजपर्यंतच्या समाजाच्या दक्ष व जागृतीमुळे सदर जागा साबूत राहिलेली आहे. यामागे समाजाचा फार मोठा त्याग व परिश्रम लपलेला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. ती जागा समाजाच्या मालकीची असल्यामुळे त्या जागेतून व्यासायाद्वारे उत्पन्न होणारी रक्कम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अथवा गरीब , गरजू, होतकरु विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी किंवा समाजातील गरीब मुला- मुलींच्या लग्नासाठी मोफत जागा मिळत नसेल आणि तिचा वापर फक्त ठराविक व्यक्ती स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक गडगंज नफा मिळविण्यासाठी होत असेल तर कितपत योग्य आहे?
याविषयी आतातरी समाजाने विचार करायला हवा,
नाहीतर एक दिवस असा म्हणावा लागेल की, काही वर्षांपूर्वी ही समाजाची जागा होती, पण समाजाच्या भेकड वृत्तीमुळे ही जागा समाजाची राहिलेली नाही.

*यामागे मुख्य हेतू हाच की, एकंदरीत या जागेचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही तरी चालेल पण दुर्लक्षमुळे किंवा स्वार्थापायी समाजाच्या मालकीची असलेली ही जागा हळूहळू करुन बिल्डरांच्या घशात जाऊ नये एवढंच!*

*हाच शुद्ध हेतू व समाजाला दक्ष राहण्याचे नम्र आवाहन!*

जर ह्या लेखाविषयी कोणाला आक्षेप असेल तर गेल्या पंचवीस वर्षांपासून ह्याजागेतून मिळालेले आर्थिक उत्पन्न, जागेचा नाव सांगून इतर मिळालेले उत्पन्न, आजपर्यंत शासकीय माध्यमातुन मिळालेले आर्थिक सहाय्य व फंड, देणगी स्वरूपात मिळालेली रक्कम, सभासद वर्गणी, आजपर्यंत पैसे घेऊन केलेली विविध कार्यक्रम , व्यायाम शाळेतून मासिक मिळणारा उत्पन्न तसेच बँकेच्या खात्याव्यतिरिक्त मिळालेली रक्कम आणि त्यातून केलेला विकास यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे लेखाजोखा सहित समाजासमोर ठेवावित व पुराव्यानिशी सिद्ध करावित. आम्ही केलेला आरोप हा खोटा आहे हा सिद्ध करावा म्हणजेच आम्हीही त्याच्यासमोर माफी मागायला तयार असू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here