सुनेने केली सासूची हत्या, मृतदेह पोत्यात भरुन लावली विल्लेवाट, सीसीटीव्हीमुळे फुटलं बिंग.

✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे,दि.24 मे :- पुणे जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परीवारीक वादातून सुनेने सासूचा गळा आळवून खून केल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना पुण्यातील तळेगावात घडली. इतकंच नव्हे तर सासूची हत्या केल्यानंतर सुनेने सासूचा मृतदेह पोत्यात भरुन शेजारील झुडपातही फेकला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि सुनेचे बिंग फुटले.
जेव्हा पोटचा मुलागाच मातेच्या हत्येमध्ये सामिल होते तर, नात्याला काळीमा फासते. जन्म दिलेला मुलगा आणि त्याचा बायकोने संगममत करुन ही हत्या केल्याची पोलीस तपासात समोर आलं आहे. बेबी शिंदे असं सासूचं नाव होतं. तर पूजा शिंदे असं सुनेचं आणि मिलिंद शिंदे असं मुलांचं नाव आहे. दोघांना तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.